आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.
भारतातील राजकीय व्यंगचित्रांचा पुरेसा सूक्ष्म अभ्यास अकादमिकांनी अजून केलेला नाही. संशोधन करत असताना सामाजिक सुधारणा, जात व अस्पृश्यता यांवरची व्यंगचित्रं योगायोगाने माझ्या समोर आली. दफ्तरांमधून संकलन करत असताना माझ्या लक्षात आलं की, अगदी नियम असल्याप्रमाणे आंबेडकरांचं नकारात्मक चित्रण करताना ‘राष्ट्रवादी’ भारतीय प्रसारमाध्यमांनीही त्यांच्याबाबतीत अन्याय्य भूमिका घेतली.......